Home

सोप्या भाषेत गणित समजून घ्या!

"गणिताची भीती घालवा – 'गणिती Guru' बरोबर!"

“गणिती Guru” ही एक मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली डिजिटल शैक्षणिक वेबसाइट आहे. आमचा उद्देश म्हणजे गणित अधिक सुलभ, सुसंगत आणि मजेदार बनवणे.

"गणिताशी मैत्री – माझा प्रवास ब्लॉगिंगपर्यंत!"

Sambhaji Labase
Sambhaji Labase — Founder

नमस्कार!

मी संभाजी लबासे, गणितिगुरु ब्लॉगचा निर्माता आणि लेखक. माझा जन्म महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील गुरूपिंप्री या छोट्याशा पण समृद्ध गावात झाला. शिक्षण आणि नवकल्पनांबद्दलची आवड मला लहानपणापासूनच होती.

मी MIT AOE, आळंदी येथून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आणि पुढे TATA Motors मध्ये माझ्या करिअरची सुरुवात केली. उद्योगजगतात काम करताना मिळालेला अनुभव आणि लेखनाची ओढ यामुळे मी ब्लॉगिंग क्षेत्रात प्रवेश केला.

आज ganitiguru.com या ब्लॉगच्या माध्यमातून मी मराठीतून शैक्षणिक माहिती सहज, समजेल अशा भाषेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. माझं उद्दिष्ट एकच — विद्यार्थ्यांना आणि पालकांना गणित व इतर शैक्षणिक संकल्पना समजावून सांगणे, सोपी करणे, आणि शिक्षण अधिक रोचक बनवणे.

चला, एकत्र शिकूया – समजून घ्या, प्रश्न विचारा आणि शिकण्याचा आनंद घ्या!
📚 गणितगुरु – ज्ञानाची गुरुकिल्ली